चिंचवडमध्ये महिलेसोबत शारीरीक संबंध ठेवून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

0
3504

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – एका इसमाने महिलेसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवून, त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडे एक लाखांची खंडणी मागीतली. ही घटना २१ नोव्हेंबर ते ९ जानेवारी २०१९ दरम्यान उल्हासनगर आणि चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी पीडित ३८ वर्षीय महिलेने अंबरनाथ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विश्वनाथ वाल्हे (रा. दर्शन नगरी, चिंचवडगाव) या इसमाविरोधात शिवाजीनगर अंबरनाथ ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रविवारी (दि. १३) चिंचवड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वनाथ याने पीडित ३८ वर्षीय महिलेसोबत २१ नोव्हेंबर ते ९ जानेवारी २०१९ दरम्यान चिंचवड आणि उल्हासनगर येथे जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे गुपचुप चित्रीकरण केले. विश्वनाथ याने त्याचा आणि पीडित महिलेचा झालेला संवाद महिलेच्या पतीला देखील दाखविण्याची धमकी दिली. तसेच एक लाख रूपये न दिल्यास शारीरिक संबंधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावर पीडितेने शिवाजीनगर अंबरनाथ ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र आरोपी विश्वनाथ हा चिंचवडगाव येथे राहत असल्याने पोलिसांनी ही तक्रार चिंचवड पोलिसांकडे वर्ग केली आहे. विश्वनाथला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.