इंद्रायणीनगरमधील स्पाईन रोडवर रविवारी रन फॉर स्वच्छ भारत मॅरेथॉनचे आयोजन

0
468

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – वेद इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने भोसरी, इंद्रायणीनगरमधील स्पाईन रोडवर रविवारी (दि.) रन फॉर स्वच्छ भारत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

इंद्रायणीनगरमध्ये सकाळी साडेपाच वाजता या मॅरेथॉनला सुरूवात होईल. त्यामध्ये ७ वर्षांच्या पुढील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना टी-शर्ट, ब्रेकफास्ट, ज्यूस, फ्रूट्स, हायकिस, प्रमाणपत्र व मेडल देण्यात येणार आहे. तसेच विजेत्या स्पर्धकाला १५ हजार रुपये रोख रक्कम, गिफ्ट व्हाऊचर व ट्रॉफी दिली जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.