इंडियन डेंटल असोसिएश पिंपरी चिंचवड शाखे तर्फे 6000 नागरिकांचे स्क्रिनींग

0
320

पिंपरी, दि. 19 (पीसीबी) : इंडियन डेंटल असोसिएश पिंपरी चिंचवड शाखेने कोरोना च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कंटेनमेंट आणि सुपर रेड हॉट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवार पेठ, भवानी पेठ, जुना बाजार असे मिळून 6000 नागरिकांचे स्क्रिनींग केले.

वूमन डेंटल कौन्सिलच्या सेक्रेटरी डॉ. मनीषा गरुड यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हल वर जाऊन पिंपरी चिंचवड मधील दंत योद्ध्यांनी हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या आयुष सेतू अंतर्गत राबवला आहे. यात संशयित रुग्णांची माहिती, औषध वाटप त्यांची नोंद आणि पुढील तपासणीसाठी मार्गदर्शन अशा स्वरूपात जगभर चाललेल्या कोरोना संकटाला सामोरे जाण्यात यश मिळवले आहे. या उपक्रमात
डॉ. अरुण राम,डॉ. राम पाटिल, डॉ.मोना दिवान, डॉ. संतोष पिंगळे, डॉ. विक्रम वीग यांनी सहभाग घेतला.