आव्हाडांच्या वक्तव्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदेंकडून समर्थन

0
368

सोलापूर, दि.१५ (पीसीबी) – जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात. मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी होय, शरद पवार हे जाणता राजा आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदेंनीही आव्हाडांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

शरद पवारांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. कोण काय म्हणत हा प्रश्न नाही. शरद पवार हे जाणता राजाच आहे. जाणता राजा म्हणजे एकदम नाव घेऊन बोलणे निराळे आहे. मात्र जनतेनेच त्यांना ही पदवी दिली आहे, असे सुशिलकुमार यांनी म्हटले आहे.