आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

0
910

पुणे, दि. २२ (पीसीबी) – आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने एका तरूणाने राहत्या घरात गळाफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.२१) रात्री साडेसातच्या सुमारास दत्तवाडी येथील जनता वसाहतमध्ये घडली.

आकाश ज्ञानेश्वर सदाफुले (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा आपल्या घरच्यांसोबत जनता वसाहत परिसरात राहत होता. त्याने अकरावी पर्यंतचे शिक्षण एस पी महाविद्यालयातून पूर्ण केले होते. १२ वीला त्याला शाहु महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र त्याला प्रवेश न मिळाल्याने मागील काही दिवसापासून तो नैराश्यात होता. यामुळे त्याने बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या एका मित्राला आत्महत्या करण्याबाबत व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता. दत्तवाडी पोलिस तपास करत आहेत.