आळंदीत सासऱ्याला दारु आणून न दिल्याने सुनेला किटक नाशक पाजून मारण्याचा प्रयत्न

0
1134

आळंदी, दि. २४ (पीसीबी) – सासऱ्याला दारुची बाटली आणून न दिल्याच्या कारणावरुन सुनेला मारहाण करत किटक नाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ही घटना खेड तालुक्यातील गोलेगाव येथे घडली.

याप्रकरणी अनिता संतोष चौधरी (वय ३२, रा. गोलेगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सासरे बाळू बाबु चौधरी, सासू चंपा बाबु चौधरी, नणंद सुरेखा बबन वाघोले (रा. दारुंबरे, ता. मावळ) आणि नणंद रेखा दादा गव्हाणे (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर) या सर्वांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता चौधरी यांचे पतीचे संतोष यांचे २०१२ मध्ये निधन झाले आहे. त्यानंतर आता तिने सासुरवाडीला राहु नये, असा या सर्वांचा प्रयत्न आहे. अनिता चौधरी यांच्या सासऱ्यांना दारूचे व्यसन आहे. त्यांना अनिता यांनी दारू आणून न दिल्याने या चौघांनी मिळून अनिता यांना हाताने, काठीने मारहाण केली. त्यांना घमदाटी करुन घरातील सदाबहार किटकनाशक औषध जबरदस्तीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. किटकनाशक पिले गेल्याने अनिता बेशुद्ध पडली. तिच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे बुधवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.