आर.पी.आय.चे दिलीप दामोदरे यांची लोणावळ्याच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

0
275

लोणावळा, दि.२९ (पीसीबी) : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी आरपीआयचे दिलीप दामोदरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी दामोदरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी त्यांची निवड जाहीर केली. मावळत्या उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत विहित कालावधी मध्ये दामोदरे यांचा एकमेव अर्ज आला. त्याची छाननी केल्यानंतर पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा जाधव यांनी लगेचच त्यांची निवड बिनविरोध जाहिर केली.

यावेळी सभागृहात मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, माजी उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर, नगरसेवक राजु बच्चे, श्रीधर पुजारी, सुधीर शिर्के, संजय घोणे, सुनील इंगुळकर, निखिल कविश्वर, ललित सिसोदिया, भरत हरपुडे, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, पूजा गायकवाड, रचना सिनकर, मंदा सोनवणे, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सेजल परमार, अंजना कडू, जयश्री आहेर, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, अर्पणा बुटाला आदी उपस्थित होते. दिलीप दामोदरे यांची निवड झाल्यावर सर्व नगरसेवकांसह माजी मंत्री बाळा भेगडे,तालुकाध्यक्ष रवी दाभाडे, प्रशांत ढोरे, बाळासाहेब घोटकुले, कमलशील म्हस्के आदींसह मान्यवरांनी दामोदरे यांची अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.