आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. पवन साळवे यांना पदोन्नती

0
175

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी तर,  कार्यकारी अभियंता  प्रमोद ओंभासे यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे.

आरोग्य वैद्यकी अधिकारी हे रिक्त पद भरण्यासाठी 28 जुलै 2017 रोजी पदोन्नती समितीची सभा आयोजित केली होती. डॉ. अय्यर राजशेखर सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. साळवे हे पदोन्नतीकरीता आवश्यक असणारी अर्हता धारण केलेले एकमेव वैद्यकीय अधिकारी होते. डॉ. अनिल रॉय हे डीपीएच ही शैक्षणिक अर्हता धारण करत नव्हते. त्यामुळे डॉ. साळवे यांचा आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावरील पदोन्नतीचा विचार करणे आवश्यक होते. विधी समितीमार्फत महापालिका सभेसमोर प्रस्ताव सादर करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार महासभेने 20 मार्च 2018 रोजी डॉ. साळवे यांना पदोन्नती देण्यास मान्यता दिली होती.

डॉ. रॉय हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका निष्फळ ठरली. या पदावर नियुक्ती करण्यासाठी हरकत वाटत नसल्याचा अभिप्राय कायदा सल्लागारांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी दिला आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी 23 सप्टेंबर 2022 रोजी पदोन्नती समितीची सभा झाली. कायदा सल्लागार यांचा अभिप्राय, 28 जुलै रोजीचा पदोन्नती समितीचा निर्णय, महापालिका सर्वसाधारण सभेचा 20 मार्च 2018 च्या ठरावाची अंमलबजावणी करणे संयुक्तीक होईल. न्यायालयीन निर्णय, शासन मान्यतेच्या अधिन राहून डॉ. साळवे यांना वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्याची शिफारस पदोन्नती समितीने केली.  

तर, महापालिकेतील सह शहर अभियंता (स्थापत्य) सतिश इंगळे हे 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ते रिक्त पद पदोन्नतीने भरण्यासाठी 23 सप्टेंबर 2022 रोजी पदोन्नती समितीची सभा झाली. शैक्षणिक अहर्ता, अनुभव कालावधी, आरक्षण, सेवा ज्येष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व आणि शिस्तभंग विषयक कारवाई इद्याकी सेवाविषयक तपशील पडताळून कार्यकारी अभियंता श्रीकांत ओंभासे यांना सह शहर अभियंता पदी पदोन्नती देण्याची शिफारस समितीने केली. त्यानुसार ओंभासे यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती दिली. या आदेशाची त्यांच्या सेवापुस्तकात नोंद केली जाणार आहे.