आरटीओ कार्यालये आजपासून सुरू

0
337

पुणे, दि. १८ (पीसीबी) : पुणे जिल्ह्यात सोमवारपासून राज्य परिवहन प्रादेशिक कार्यालय (आरटीओ) सुरु होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत आरटीओ सुरु होणार आहे. सोमवारपासून नवीन वाहनांची नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. वाहन मालकांना नंबर दिला जाणार आहे.

आरटीओ कार्यालयातील इतर कामकाज संदर्भात आराखडा तयार करण्यात येणार आहे. वाहन परवाना, जुन्या गाड्यांची खरेदी विक्री, हस्तांतरण यासंदर्भात नियोजन करुन आराखडा तयार केला जाणार. किती कर्मचारी कामावर येणार, कंटेनमेंट झोन कोणकोणते आहेत. नाव नोंदणीसाठी नागरिकांना कशा पद्धतीने बोलवायचं यासह इतर बाबींचा आराखडा तयार केला जाणार आहे. ‌कंटेनमेंट झोनमधील डीलरच्या नवीन गाड्यांची नाव नोंदणी होणार नाही. कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणच्या डीलरच्या नवीन गाड्यांची नाव नोंदणी होईल.

यापूर्वी रोज सहाशे ते सातशे वाहनांची नोंदणी होत होती मात्र आता सध्या किती वाहनांची नोंद होते याबाबत अनिश्चितता आहे. लॉकडाऊनमुळं अनेक जणांना वाहनाची नाव नोंदणी करता आली नाही. अनेकांना वाहन नंबर मिळाला मात्र रजिस्ट्रेशन झालं नव्हतं. मात्र आता या वाहन मालकांना नाव नोंदणी करता येणार आहे‌‌.