’ते’ आयुक्त झाले कोरोनामुक्त

0
332

प्रतिनिधी,दि.१८ (पीसीबी) : आरोग्य मंत्री राजेश टोपे हे मालेगावी मध्ये आढावा बैठक घेत असतानाच महापालिका आयुक्त व स्वच्छता सहआयुक्तांची कोरोनाची टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यामुळे राज्यांत खळबळ उडाली होती. आपत्कालीन व्यवस्थेचे नेतृत्व करणारे आयुक्तच करोनाबाधित झाल्याचे प्रशासन हादरले होते. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. करोना बाधित झालेले आयुक्त चार दिवसातच कोरोनामुक्त झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरला आहे. नाशिक मधील एकुण ८५१ रुगण संख्येपैकी एकट्या मालेगावात सुमारे ६३५ कोरोना पाॅझिटीव रुग्ण आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत मालेगाव मध्ये दि १३ मे रोजी शासकीय विश्रामगृहात करोना संदर्भात आयोजित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आरोग्यमंत्री टोपे शहरातील कोरोना संक्रमणाचा आढावा घेत होते. याच वेळी आयुक्तांकडून टोपे यांना मालेगावमधील परिस्थिती सांगितली जात होती. दरम्यान, आयुक्तांना अचानक त्यांची कोरोना टेस्ट बाधित सिद्ध झाल्याचे समजले. याचवेळी एका क्षणाचाही विलंब न करता आयुक्तांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यासोबतच सहआयुक्त यांचादेखील अहवाल बाधित आढळून आल्यामुळे त्यांनीही बैठक सोडली. यावेळी बैठकीला आरोग्य मंत्र्यांसमवेतच, कृषी मंत्री दादा भुसे , लोकप्रतिनिधी व विविध शासकीय अधिकारी उपस्थित असल्याने खळबळ उडाली होती. मालेगावात बंदोबस्तावर असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या १०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच मनपा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांचा कोरोना बाधित रुग्णांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्क येत असल्याने त्यापैकी अनेक जणांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आयुक्त कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यावर होम क्वाॅरंटाईन होण्याची वेळ आली. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिस नसल्याने व त्यांना कोणताही त्रास नसल्याने शनिवारी त्यांनी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात आयुक्त कोरोनामुक्त झाल्याचे उघड झाले आहे. मालेगावात रुग्ण बरे होण्याचे वाढलेले लक्षणीय प्रमाणामुळे शहरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत मालेगावातील ४३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पाठोपाठ चारच दिवसांनी केलेल्या आयुक्तांच्या दुसऱ्या करोना चाचणीचा अहवाल आता निगेटीव आल्याने सर्वानाच आनंद झाला आहे.