आयकरचे छापे कुठे पडले??? दौंड शुगर, आंबालिका शुगर, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार शुगर्स…

0
244

पुणे, दि. ७ (पीसीबी) : राज्यातील साखर कारखान्यांवर आयकर विभागानं मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागानं राज्यातील पाच साखर कारखान्यांवर आणि बारामतीमधील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.

जरंडेश्वरवर पुन्हा छापा
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागानं छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांकडे चालवण्यासाठी आहे. कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. ईडीनं यापूर्वीचं जरंडेश्वर साखर कारखाना यापूर्वी सील केलेला आहे.

छापे पडलेले कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तींयांचे?
आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आयकर विभागानं कारवाई केलेले साखर कारखाने हे अजित पवारांच्या निकटवर्तींयांचे असल्याची माहिती आहे.

बारामतीमध्येही छापे
बारामतीत दोन ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापे टाकले आहेत. हे छापे नेमके ईडी किंवा आयकर विभागाचे आहेत हे अद्याप समजलेले नाही. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे.

भाजपचे पण कारखाने आहेत, त्यांच्यावर कधी कारवाई
अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आयकर विभागाकडून पाच साखर कारखान्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे देखील अनेक कारखाने आहेत, त्यापैकी एकावर पण कारवाई नाही, असं ते म्हणाले आहेत. आधी कारवाई करायची,मीडियात मोठी प्रसिद्ध द्यायची आणि नंतर तो निर्दोष सुटतो, मी या कारवाईचे उत्तम उदाहरण असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं आहे.