“आम्हाला कोणत्याही प्रकारे सरकारवर टीका करायची नाही. उलट सरकारला आमचा पाठिंबा आहे”

0
315

मुंबई,दि.९(पीसीबी) – कोरोनाचं संकट राज्य सरकार हाताळत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारे सरकारवर टीका करायची नाही. उलट सरकारला आमचा पाठिंबा आहे, असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

मरकजमध्ये सहभागी झालेले किती लोक राज्यात आहेत. हे अजूनही राज्य सरकार शोधू शकलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकार यात ढिलाई दाखवत आहे का?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान,राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.