जितेंद्र आव्हाडांच हे कृत्य शरद पवार यांच्या प्रतिमेला धक्का देणारे – रामदास आठवले

0
331

 

मुंबई, दि.९ ( पीसीबी) – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचे प्रकरण गेले दोन दिवस वादंग सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दुसऱ्या बाजूला आव्हाड समर्थकही आक्रमक झाले आहेत. राज्यभरातून या घटनेला संमिश्र प्रतिसाद येत आहेत. या परिस्थितीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी थेट शरद पवार यांच्या प्रतिष्ठेच्या मुद्यावर भाष्य केलेले आहे.

बोलताना आठवले म्हणाले,” जितेंद्र आव्हाड यांच्या समक्ष घडलेल्या मारहाणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, अशी टीका केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘ सोशल मिडियात विरोधात पोस्ट टाकली म्हणून मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समक्ष जबरी मारहाण झाल्याचा प्रकार चुकीचा आणि दादागिरीचा आहे. जितेंद्र आव्हाड हे मंत्री आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे हे त्यांनी विसरू नये. ते शरद पवारांच्या जवळचे नेते असल्याने या मारहाणीच्या प्रकारामुळे शरद पवार यांच्या प्रतिमेला धक्का देणारे वर्तन जितेंद्र आव्हाड यांच्याकडून झाले आहे. त्यांनी या प्रकरणी माफी मागावी.’ अशी मागणीही आठवले यांनी यावेळी केली आहे.