आमदार राहुल कुल यांना सपवण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना अटक

0
471

दौंड, दि. २ (पीसीबी) – दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांना संपवण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि.१) अज्ञात इसमाने पोलिस अधिक्षकांना आमदारांची गाडी उडवणार आहोत, तसेच आमदार राहुल कुल यांना संपवणार आहोत, असा मेसेज केला होता.

या घटनेची गांर्भीय जाणून पोलिसांनी तातडीने हालचाली सुरु करुन काही तासातच आरोपींना जेरबंद केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पोलिस अधिक्षकांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने  आमदारांची गाडी उडवणार आहोत, आमदार राहुल कुल यांना संपवणार आहोत, अशा धमकीचा मेसेज पाठवला होता. यावर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तातडीने आरोपींना अटक केली. कुल यांना खुनाची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दौंडकरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा राहू परिसरातील पाटेठाण, पिलानवाड़ी तसेच इतरही गावामध्येही निषेध नोंदविण्यात आला. मात्र आरोपींना अटक केल्याचे कळताच दौंडकरांनी सुटकेचा श्वास घेतला.