आमच्यावरील ईडीचे संकट बाप्पा नक्की दूर करेल – मनोहर जोशी

0
426

मुंबई, दि. २ (पीसीबी) – गणपती बाप्पा चांगल्या लोकांची विघ्न दूर करतो, आमच्यावरील ईडीचे संकट बाप्पा नक्की दूर करेल’, अशा भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी  व्यक्त केल्या आहेत.  जोशी यांच्या घरी आज  (सोमवार) गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर  त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची  कोहिनूर मिल प्रकरणी ईडीकडून चौकशी झाली आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील या प्रकरणी चौकशी केली आहे.  त्यामुळे याप्रकरणी ईडीची टांगती तलवार कायम आहे. याबाबत बोलताना मनोहर जोशी यांनी आपल्या मुलाच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, ईडीचे संकट बाप्पा दूर करेल, अशी आशा व्यक्त केली .

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी मनोहर जोशी म्हणाले की, छगन भुजबळ एक चांगला कार्यकर्ता आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. भुजबळ कामाला लागले की ते काम करतात. त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम असतो. त्यांच्यापुढे कोणी जात नाही.