पिंपरी चिंचवड स्मार्ट सीटी लिमिटेडचे ऑटो क्लस्टरमध्ये स्वतंत्र कार्यालय

0
683

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर पिंपरी चिंचवड स्मार्ट सीटी लिमिटेड या कार्यालयाचे उदघाटन महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते तथा संचालक सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता प्रविण तुपे, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, नगरसचिव उल्हास जगताप, जनरल मॅनेजर अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, उपअभियंता विजय भोजने, लक्ष्मीकांत कोल्हे, हरविंदरसिंग बन्सल, कनिष्ठ अभियंता सुनिल पवार, नरेश जाधव, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड स्मार्ट सीटी लिमिटेडच्या कामकाजामध्ये सूसुत्रता व कामकाज गतीमान होण्यासाठी या कार्यालयाची निमीर्ती झाली असून स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आल्यामुळे एकाच ठिकाणी सर्व संबधीत अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून पिंपरी चिंचवड स्मार्ट सीटी लिमिटेडचे कामकाज सुरळीत होणार आहे.

तसेच महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते ई- बाईक व ई-सायकलिंगचे उदघाटनही यावेळी संपन्न झाले.