आदिवासी मुलीशी प्रेमविवाह केल्याने मुस्लीम तरुणाची जमावाकडून हत्या

0
482

गुजरात, दि. २८ (पीसीबी) – आदिवासी मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून १० ते १२ जणांच्या जमावाने मिळून एका अल्पवयीन मुस्लीम मुलाला काठ्या आणि पाईपने बेदम मारहाण करुन हत्या केली. ही घटना गुजरातच्या झागडीया तालुक्यात घडली.

फैज मोहम्मद कुरेशी (वय १७) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चार जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.२४ जुलै) आदिवासी मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून १० ते १२ जणांच्या जमावाने फैजला काठ्या आणि पाईपने मारहाण केली. फैजच्या वडील मोहम्मद सुलतान अब्दुल रहमान कुरेशी यांना ही बाब समजताच त्यांनी घटनास्थळी जावून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र फैजच्या हाताला, पोटाला, पाठीला प्रचंड जखमा होत्या. यामुळे त्याला वाचवणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी त्याच्या वडीलांना सांगितले. त्यानंतर त्याला सुरत येथील रुग्णालयात हलवले, मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना शनिवारी अटक केली आहे.

दरम्यान, माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी फैजच्या वडिलांनी केली आहे. मला हे ठाऊक नाही की ते नेमके कोण लोक होते पण अनेक लोकांच्या जमावाने त्याला मारहाण केली. फैजच्या आईनेही आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली आहे.