आता सर्व सरकारी अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने वापरणे बंधनकारक ?

0
450

नवी दिल्ली,दि.२०(पीसीबी) – मंत्रालयातील आणि सरकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने वापरणे बंधनकारक करावे, असे केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले. ते ‘गो इलेक्ट्रिक’ या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ते म्हणाले, “आपण घरगुती स्वयंपाकासाठी गॅस खरेदी करण्यास अनुदान देण्याऐवजी, विद्युत स्वयंपाकाची उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान का देत नाही?” सरकारने घरगुती स्वयंपाकासाठी गॅस खरेदी करण्यास पाठिंबा देण्याऐवजी स्वयंपाकाची विद्युत उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांना आपल्या विभागातील अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरणे अनिवार्य करावीत असे अवाहन त्यांनी केले. आपणही आपल्या विभागात असे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये जर १०,००० इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला तर केवळ महिन्याला ३० कोटी रूपयांची बचत होईल. यावेळी सिंग यांनी जाहीर केले की लवकरच दिल्ली ते आग्रा आणि दिल्ली ते जयपूर अशी फ्युएलसेल बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.