पुणे शहर, जिल्हा व पिंपरी चिंचवड मिळून 1087 कोरोना रुग्ण

0
422

पुणे, दि.19 (पीसीबी) : पुणे शहर, जिल्हा व पिंपरी चिंचवड मिळून 1087 कोरोना रुग्ण आज आढळले. पुणे विभागातील 5 लाख 79 हजार 550 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 2 हजार 810 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 52 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 208 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.14 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 94 हजार 726 रुग्णांपैकी 3 लाख 80 हजार 368 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 294 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.36 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 57 हजार 539 रुग्णांपैकी 54 हजार 909 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 792 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 838 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 108 रुग्णांपैकी 49 हजार 561 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 727आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 820 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 305 रुग्णांपैकी 46 हजार 445 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 105 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 132 रुग्णांपैकी 48 हजार 267 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 134 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ मोठी आहे.
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1017 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 857, सातारा जिल्ह्यात 90, सोलापूर जिल्ह्यात 51, सांगली जिल्ह्यात 8 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 475 आहे. पुणे जिल्हयामध्ये 392, सातारा जिल्हयामध्ये 33, सोलापूर जिल्हयामध्ये 24, सांगली जिल्हयामध्ये 19 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 7 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 38 लाख 84 हजार 484 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 2 हजार 810 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.