आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडी ची नोटीस

0
239

 

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रविण राऊत यांच्या खात्यातून ५० लाख रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाल्याचा संशय

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – शिवेसनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांच्यावर फर्मवर ईडीने छापे टाकले होते. सुमारे ४ हजार ३५० कोटी रुपयांच्या पीएमसी घोटाळ्याच्या प्रकरणावरून आता शिवेसनेचे प्रवक्ते खासदार आणि दै. सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांनी ईडी ची नोटीस मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रकऱणावरून ईडी वर टीकेची झोड उठवली आहे. हे सुडाचे राजकारण आहे, ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांच्या माध्यमातून विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा भाजपाकडून होत आहे, असे महाआघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

शिवेसना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्या प्रकऱणात त्यांची चौकशी करायची आहे. एचडीआयएल चे कनेक्शन मधून एचडीआयएलचे संचालक वाधवान यांना ४३५० कोटींचे कर्ज दिले होते. या प्रकऱणातून काही रक्कम वर्षा राऊत किंवा त्यांचे निकटवर्ती यांच्यापर्यंत पोहल्याचे ईडी ला मिळाली आहे, असा ईडीची माहिती आहे. यापूर्वी ११ डिसेंबरला पहिली नोटीस दिली गेली होती, असे सांगितले जाते. त्याचवेळी हजर राहणे अपेक्षित होते. आता दुसरी नोटीस आली असून २९ डिसेंबरला ईडी समोर हजर राहण्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे. प्रविण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत. ते एचडीआयएल साठी काम करत आहेत. त्यांच्या अकौंटमधून वर्षा राऊत यांच्या खात्यात काही रक्कम आल्याची माहिती ईडी च्या सुत्रांनी दिली आहे.

ईडी च्या सुत्रांनी सांगितले की, पीएमसी बँक घोटाळ्याच्या प्रकऱणात काही नावे समोर आली आहेत, त्यात वर्षा राऊत यांचे नाव आहे. काही लोकांची चौकशी कयारची आहे. हे प्रकरण आठ-दहा वर्षांपूर्वीचे आहे. यापूर्वी त्याची अनेकदा चौकशीही झाली आहे.

खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीसाठी आणि विशेषतः संजय राऊत यांनी तुफानी हल्ला सुरू केला आहे. भाजपा, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर राऊत यांनी सामना तसेच पत्रकार परिषदांमधून टीकेची झोड उढविली आहे. त्यामुळेच राऊत यांच्या पत्नीला जुनेच प्रकरण काढून नोटीस बजावण्यात आल्याची राजकीय चर्चा आहे.

खासदार संजय राऊत नोटीस बाबत म्हणाले, मला कुठलिही माहिती नाही. घरी जाऊन या संदर्भात माहिती घेऊन जनतेसमोर पत्रकार परिषदेत भूमिका मांडणार आहे. यापूर्वी शरद पवार, अजित पवार, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, वर्षा राऊत यांना ईडी च्या नोटीसा आल्या आहेत. पवार यांना ईडीसी नोटीस दिल्याने भाजपाची राज्यातील सत्ता गेली.

संजय राऊत यांना ईडी ची नोटीस आल्यावर विविध नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया अशा आहेत –

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत – ईडीचे ऑफिस हे भाजपाच्या संपर्कात. प्रिव्हेन्शन ऑफ ऑपोझिशन लिडर्सची मोहीम ते राबवतात. हा अगदी लज्जाहीनतेचा कळस आहे. फडणवीस सरकार काळातील हे प्रकरण आहे, मग यापूर्वी ईडी झोपली होती का.

भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर – शिवसेनेने नैतिकतेचा आव आणू नये. संजय राऊत यांनी लोकशाहिविषयी बोलण्याचे आता बंद करावे. या आठवड्यातच महाराष्ट्राच्या विधानसभेतील सदस्य आमदार रत्नाकर गुंटे यांची २५० कोटींची मिळकत ईडी ने जप्त केली आहे. गुटे यांचा भाजपाला पाठिंबा आहे हे विसरू नका. संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस आली आहे, पण काही घोटाळा नसेल तर त्यांनी घाबरायचे कारण नाही. याऊपर त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावेता येतील.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत – रविवारचा शुभमुहूर्त आहे का. ईडी वेडी आहे. किती पूर्वग्रहदुषित आहेत हे लोक. अत्यंत निंदाजनक प्रकार आहे. भाजपाने सत्तेसाठी कंबरेचे सोडले आणि डोक्याला गुंडाळले आहे. इतके घाणेरडे कोणत्या थराला चालले ते समजत नाही. ईडीसुध्दा आता पिंजऱ्यतला पोपट झाला आहे. हे राष्ट्रीय संस्थांचे अवमुल्यन केले आहे. संजय राऊत हे बिनधास्त आहेत, ते पर्वा नाही करणार. भाजपाकडे सगळे धुतल्या तांदळाचे आहेत काय. त्यांच्याकडे गेल्यावर वाल्ह्याचा वाल्मिकी होतो. दुसऱ्यासाठी खनलेले खड्डे स्वतःसाठी हे लक्षात ठेवा.

भाजपाचे प्रवक्ते राम कदम – काहीही झाले तर केंद्राकडे बोट दाखवले जाते. मुंबई महापालिका एखाद्याचे घर तोडते ते सुडाचे राजकारण नाही काय. एखाद्या पत्रकाराला रातोरात उचलता ते सुडाचे राजकारण नाही का आणि तुमची चौकशी झाली की सुडाचे राजकारण. दोन्ही बाजुनवे ढोल बडवतायत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक – शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती. ईडीचा खेळ चाललाय. ईडीच्या नोटीसा पाठविल्या तरी आम्ही घाबरणार नाही. दोन दिवस बोलवायचे, प्रतिमा मलिन करायची हाच  ईडी चा उद्योग. महाराष्ट्राच्या एका अधिकाऱ्याला ईडी जॉईन करायला सांगितले, त्यांनी नकार दिला.