आता मनसेचा भाजपवर ‘पेपर बॉम्ब’; ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवा

0
719

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला भाजपने  ‘आता बघाच तो व्हिडीओ’असे  म्हणत आज (शनिवार) उत्तर दिले.  यानंतर आता मनसेकडून भाजपला एक ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका देत ‘पेपर बॉम्ब’ टाकला आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आवाहन मनसेने भाजपला केले आहे. 

मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर  प्रसिध्द केल्या आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी २ दिवसांचा वेळ दिला आहे.

या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न खालीलप्रमाणे –

१ मी पुलवामामधील शहीद बोलतोय

२ चहावाला ते चौकीदार

३ विकास वेडा झालाय

५ ‘खोटं बोलणं’ सवय की आजार

तसेच एका वाक्यात उत्तरे द्या, संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, ५० ते ६० शब्दात उत्तरे द्या, ७० ते ८० शब्दात उत्तरे द्या, असे प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले आहेत.

यामध्ये ‘पाकिस्तानच्या कुठल्या नेत्याला मोदी पंतप्रधान व्हावे असं वाटतं? , शेतकऱ्यांना साले कोण म्हणाले ?, १५ लाखांचा जुमला कुणी दिला?, जवानांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त वक्तव्य कुणी केले? मुलींना पळवून आणून देतो, असे कोणता नेता म्हणाला? यासह भाजपला कोंडीत पकडणारे अनेक प्रश्न केले आहेत.