“आता पुण्यातील कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार”

0
1202

पुणे,दि.२१(पीसीबी) : पुणे जिल्हा खूपच झपाट्याने कोरोनाच्या विळख्यात येत आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असून पुणे शहरासह ग्रामीण भागातीही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे आता पुण्यातील कंन्टेमेंट झोनमधील निर्बंध अधिक करणार असल्याचं पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितलं आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पूर्वी कोरोनाविषयी असलेली भिती आता कमी झाली आहे. मात्र निष्काळजी न करता सर्तक राहणे गरजेचे आहे, असं डॉ.अभिनव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. अभिनव देशमुख यांनी रविवारी बारामतीचे अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडून पुणे अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला.

तसेच कोरोना लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोनाची लागण झाली तर 90 टकके लोक बरे होतात. परंतू त्यासाठी आपण हि काळजी घेतली पाहिजे. नियमित मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे हे नियम पाळले पाहिजेत. आता आधीच्या तुलनेत पुणे, पुणे ग्रामीण , पिंपरीचिंचवड शहरातील कोरोना बाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.