आता नवनीत राणा दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र

0
381

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – खासदार नवनीत राणा विरुध्द शिवसेना असा सामना रंगला आहे. हनुमाना चालीसा पठणावरून सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणावरून मुंबईत भाजप-शिवसेनेत मोठा राडा झाला होता. यामध्ये राणा पती-पत्नीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर आरोपही केले आहेत. दरम्यान, आता नवनीत राणा दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात हे पत्र असल्याची माहिती मिळत आहे.

या पत्रात खासदार राणा यांनी लिहलंय की, मी अनुसूचित जातीची आहे. मी शिवसेना विरोधात निवडून आले आहे. त्यामुळे शिवसेना नेता कार्यकर्ते मला धमकावत आहेत. माझ्या जातीबाबत खोटे आरोप माझ्यावर लावले जात आहेत. मी निवडून आल्यावर खासदार संजय राऊत वारंवार माझ्या विरोधात बोलत आहेत. मी एका विशिष्ठ जातीची आहे हे माहित असतानाही मध्यामांना मुलाखती देताना आमचा बंटी आणि बबली असा उल्लेख करतात. राऊत मला बदनाम करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

दिलीप वळसे पाटील बंगल्यावरुन निघत असून ते वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जात आहेत. माझ्या घराकडे शिवसैनिक आले त्यांनी आंदोलन करून घराला वेढा घातला. त्यामुळे संजय राऊत आणि शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात अट्रोसियटी कायद्या अंतर्गत तक्रार दाखल करावी, असं त्यांनी लिहलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोगस जात प्रमाणपत्र वापरणाऱ्या खासदारांनी पुन्हा लोकसभेत पुन्हा निवडून येऊन दाखवावं, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांना दिलं आहे. त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा फोटो शेअर करत नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचा दावाही केला आहे. ‘हे लोक fraud..bogus, आम्हाला हनुमान चालीसा पाठ ऐकवणार’, असंही राऊत यांनी ट्विट केलं होतं. माध्यमांसमोर त्यांनी याबाबत सातत्याने वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता राणा यांनी थेट दिल्ली पोलिसांकडे राऊतांची तक्रार केली आहे.