…अखेर कुणाल आयकॉन रोडने घेतला मोकळा श्वास

0
296

पिंपळे सौदागर, दि. २७ (पीसीबी) – महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या प्रयत्नातून, सर्व हॉकर्स चालक व्यवसायिक यांच्या सहकार्याने कुणाल आयकॉन रोड येथील सर्व हातगाडी, पाथारी, विक्रेते यांचे आज  (बुधवारी) रोसेलेंड सोसायटी शेजारील राजमाता जिजाऊ उद्यान येथील पार्किंगच्या जागेत स्थलांतरण करण्यात आले. त्यामुळे कुणाल आयकॉन रोड हॉकर्स मुक्त झाला आहे. रोडने मोकळा श्वास घेतला.

पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन हा रोड होकर्स मुक्त व्हावा अशी येथील सर्व गृहनिर्माण सोसायटी मधील नागरिकांनची मागणी होती. त्या दृष्टीने माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या प्रयत्नातून व सर्व हॉकर्स चालक व्यवसायिक यांच्या सहकार्याने सर्व हातगाडी, पाथारी, विक्रेते यांचे राजमाता जिजाऊ उद्यान येथील पार्किंगच्या जागेत या कुणाल आयकॉन रोड वरील सर्व हॉकर्सना स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे सर्व कुणाल आयकॉन रोड हॉकर्स मुक्त झाला आहे.

यामुळे सर्व नागरिकांना भाजीपाला, फळे खाद्य पदार्थ एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय देखील दूर होईल. त्याच धर्तीवर येत्या काही दिवसात  शिवसाई रोड वरील हॉकर्सचे देखील पिंपळेसौदागर येथील भाजी मंडई येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. शिवसाई रोड देखील हॉकर्स मुक्त होईल असे नाना काटे यांनी सांगितले.