आता नकळतपणे Whatsapp च्या ग्रुप मधून बाहेर पडता येणार ?

0
265

नवी दिल्ली,दि.२५(पीसीबी) – WhatsApp कडून आपल्या वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी दोन फीचर्सची चाचणी करत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना ग्रुपींग चाटमध्ये सुलभता येईल. सध्या यावर WhatsAppकडून या फीचर्सची चाचणी सुरू आहे. तर या नव्या येणाऱ्या नव्या फिचर्समुळे ग्रुप अॅडमिन्सची ताकद वाढेल. तसेच तो ग्रुप चॅटमधील नको असलेला कोणताही संदेश हटवू शकेल. तर व्हॉट्सअॅप आता एका नवीन गोष्टीवर काम करत आहे ज्यामुळे युजर्स शांतपणे ग्रुप्समधून बाहेर पडू शकतील. तसेच विशेष म्हणजे, मागे एखाद्याने मेसेज कधी सोडला होता हे देखील यातून कळेल का याचीही चाचणी WhatsApp करत आहे.

त्याचबरोबर WaBetaInfo च्या अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की “View Past Participants” नावाचे एक नवीन वैशिष्ट्य विकसित होत आहे. अॅपच्या बीटा आवृत्त्यांपैकी एकामध्ये आढळून आलेले हे वैशिष्ट्य होते. जे भूतकाळात आपल्या ग्रुपचा भाग कोण होता हे ग्रुपमधील कोणालाही पाहता येत होते. तर सध्या, जेव्हा एखादा वापरकर्ता ग्रुप सोडतो तेव्हा मेसेजिंग अॅप चॅटमध्ये एक मेसेज येतो की त्याव्यक्तीने ग्रुप सोडला आहे.
कोणतीही सूचना पाठविली जाणार नाही

व्हॉट्सअॅप देखील अशा एका वैशिष्ट्यावर काम करत आहे जे ग्रुपमधील सहभागी लोकांना ग्रुपमधून बाहेर पडण्याची परवानगी देते आणि कोणालाही कोणतीही सूचना पाठविली जाणार नाही. येथे, भूतकाळातील सहभागींना “View Past Participants” मधून कोणालाही कोणी ग्रुप सोडला किंवा कोणी मेसेज केला होता हे पाहता येत होते. मात्र आता येणाऱ्या नव्या फिचर्समुळे कोण बाहेर पडला किंवा त्यांना मेसेज केला हे पाहता येणार नाही. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे सध्या याच्यावर टेस्टींग सुरू आहे.

तर अशी शक्यता आहे की प्रत्येकाने ग्रुप सोडला आहे हे तपासण्याचा मार्ग पूर्णपणे काढून टाकण्याशिवाय व्हॉट्सअॅप लोकांना आणखी काही गोपनीयता देऊ इच्छित आहे. म्हणून, जर कोणाला जुन्या सहभागींबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ते गटाच्या प्रोफाइलमध्ये जाऊन तसे करू शकतात. त्यात शेवटी View Past Participants नावाचा पर्याय असेल.
ही वैशिष्ट्ये येण्याची शक्यता

व्हॉट्सअॅप फक्त नाव किंवा जुन्या सहभागींची संख्याच दाखलेव असे नाही हे ही सध्या स्पष्ट नाही. व्हॉट्सअॅपच्या स्थिर आवृत्तीमध्ये ही वैशिष्ट्ये कधी येतील हे ही अद्याप स्पष्ट झालेले नाही. “Silent group exit” वैशिष्ट्य डेस्कटॉप आवृत्तीवर दिसून आले आहे. तर मागे ग्रुपमधील लोकांनी Android बीटा आवृत्तीवर ते पाहीलं आहे. तर स्त्रोतांकडून अशी माहिती मिळते की, नजीकच्या काळात व्हॉट्सअॅपच्या इतर आवृत्त्यांमध्ये ही वैशिष्ट्ये येण्याची शक्यता आहे.