आता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मोदींची साथ सोडली – मायावती  

0
410

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण  संपले  आहे. आता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मोदींची साथ सोडून दिली आहे. मोदी यांनी आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, त्यामुळे  जनतेत नाराजी आहे. आता संघाचे स्वयंसेवकही प्रचारात सहभागी होत नाहीत, यामुळे मोदी हवालदील झाले आहेत, अशी सडकून  टीका बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख  मायावती यांनी केली आहे.

मायावती यांनी आज ( मंगळवारी) सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात रोड शो आणि धार्मिक स्थळांवर जाऊन प्रार्थना करणे ही फॅशन झाली आहे. यावर पैशे खर्च केले जातात. निवडणूक आयोगाने या खर्चाचा समावेशही उमेदवाराच्या खर्चात केला पाहिजे, अशी मागणी मायावती यांनी केली.

जर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने एखाद्या उमेदवार किंवा नेत्याच्या भाषणांवर बंदी घातली असेल आणि संबंधित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहत असेल किंवा प्रार्थना करत असेल,  तर अशा प्रकारांवर बंदी घातली पाहिजे. निवडणूक आयोगाने अशा प्रकरणांमध्ये कारवाई केली पाहिजे, असे मायावतींनी सांगितले.