भोसरी एमआयडीसीत वृध्देच्या गळ्यातील ४० हजारांची चेन चोरट्यांनी केली लंपास

0
431

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – पायी चाललेल्या एका वृध्देच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी जबरदस्ती हिसका मारुन चोरुन नेली. ही घटना सोमवारी (दि.१३) रात्री आठच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील महाराजा चौकात घडली.

याप्रकरणी ५९ वर्षीय वृध्देने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी ५९ वर्षीय वृध्द महिला या भोसरी एमआयडीसीतील महाराजा चौकातून पायी चालल्या होत्या. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसका मारुन चोरुन नेली. भोसरी एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.