आता आघाडीत जुंपली; दिरंगाईला काँग्रेस जबाबदार-  शरद पवार

0
228

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले मतभेद उघड झालेत. काँग्रेससोबत आज कुठलीही बैठक नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. तर सत्तास्थापनेची आमची तयारी आहे. पण काँग्रेसचाच निर्णय झालेला नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी काँग्रेस नेतृत्वावर दिरंगाईचे खापर फोडले आहे. तसेच जो काही निर्णय होईल तो एकत्रितच घेऊ, असेही अजितदादांनी स्पष्ट केले. यामुळे सत्तास्थापनेचा पेच आणखीनच वाढला आहे. दरम्यान, सत्तास्थापनेवर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोअर कमिटीची बैठक होतेय. तर काँग्रेसची दिल्लीतील कोअर कमिटीची बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात येते आहे.

राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची चर्चा करून महाराष्ट्रात आल्यावर राष्ट्रावादीच्या नेत्यांशी चर्चा करतील आणि सत्तास्थापनेवर मार्ग निघेल, असे बोलले जात होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी काँग्रेससोबतच्या बैठकीबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. काँग्रेस कुठलीही बैठक होणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.