‘हम होंगे कामयाब, जरूर होंगे’; संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

0
363

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  लीलीवती रुग्णालयात एंजिओप्लास्टी झाल्यानंतर विश्रांती घेणारे शिवसेनेचे लढाऊ नेते संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत आपण मैदानातच असल्याचे सूचित केले आहे. ‘लहरों से डरकर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नही होती’, या कवितेच्या ओळी ट्विट करत ‘हम होंगे कामयाब, जरूर होंगे’, असे वक्तव्य केले आहे.

शिवसेनेची सत्तास्थापनेचा दावा करण्याची मुदत संपल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निमंत्रित केले आहे. मात्र, आपचा दावा संपलेला नसल्याचे सांगत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आमची लढाई संपलेली नसल्याचे सूचित केले होते. त्यानंतर आज संजय राऊत यांनी ट्विट करत सत्ता स्थापनेतील आपले प्रयत्न सुरूच असल्याचे सूचित केले आहे.

संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने काल त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर एंजिओफ्रीनंतर एंजिओप्लास्टी करण्यात आली.