आठवड्यात पवना धरणात ५५.०७ टक्के पाणी साठा

0
229

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : गेल्या आठवड्यात मावळात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पवना धरण ५५.०७ टक्के भरले आहे . मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्या पाण्याची पातळी वाढत आहे . धरण परिसरात २४ तासांत २३२ मिमी पावसाची नोंद झाली असून , या वर्षी १ जून पासून आजअखेरपर्यंत केवळ ११२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे . पिंपरी चिंचवड शहरातही आज दिवसभर पावसाची संतत धार सुरू आहे.

गेल्या वर्षी आज अखेरपर्यंत सुमारे ४८७ मिमी पावसाची नोंद झाली होती . पवना धरण पाणलोट क्षेत्रात २४ तासांत २३२ मिमी पावसाची नोंद झाली . धरणाचा पाणीसाठा ५५.०७ टक्के इतका झाला आहे . गत वर्षी आजअखेर धरणाचा साठा ३४.९६ टक्के झाला होता . यासह लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पुन्हा पाणी ओसंडून वाहू लागले आहे . मावळातील नद्या , ओढे नाले ओसंडून वाहत आहेत .