आज जग आमच्या अवकाश वैज्ञानिकांची ताकत पाहील – नरेंद्र मोदी

0
497

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – Chandrayaan-2 Moon Landing Date and Time: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. १३० कोटी भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तो लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. आणखी काही तासांनी चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. संपूर्ण जग आमच्या अवकाश संशोधकांचे कौशल्य आणि ताकत पाहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

बंगळुरुमधील इस्रोच्या सेंटरमधून भारताच्या अवकाश कार्यक्रमाच्या इतिहासातील हा खास क्षण पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. लँडिंगचा क्षण पाहण्यासाठी भारताच्या वेगवेगळया भागातून तरुणमंडळी सुद्धा यावेळी उपस्थित असतील. भूतानवरुन सुद्धा काही तरुण येणार आहेत अशी माहिती मोदी यांनी दिली आहे.

इस्रोने अवकाशासंबंधी घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिंकलेली मुले मोदींसोबत यावेळी हा खास क्षण पाहण्यासाठी इस्रोच्या सेंटरमध्ये असणार आहेत. या स्पर्धेमध्ये मोठया प्रमाणावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागातून त्यांची विज्ञान आणि अवकाशाबद्दलची आवड दिसून येते. हे खूप चांगले लक्षण आहे असे मोदी म्हणाले.