शिवसेना-भाजप युती होणारच; अमित शहांना खात्री

0
559

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी  शिवसेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, असाही दावा त्यांनी केला. अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली.

विरोधकांची महाआघाडी म्हणजे एक भ्रम असून महाआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत आम्ही त्या सर्वांचा पराभव केला होता. ते सर्व प्रादेशिक नेते आहेत आणि एकमेकांना साथ देऊ शकत नाहीत, असेही  शहा यांनी म्हटले आहे.

शिवसेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, असा विश्वासही अमित शाहांनी व्यक्त केला. शिवसेनेसोबत बोलणी सुरु आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. २०१९ मध्ये भाजप पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्ये आणि ओदिशातही सत्ता मिळवेल, असा विश्वास व्यक्त करून २०१४ मध्ये भाजपची केवळ सहा राज्यांत सत्ता होती, आता १६ राज्यांत आहे. मग २०१९ मध्ये निवडणुका कोण जिंकेल? असा प्रतिप्रश्न शहा यांनी  केला.