आकुर्डीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला १ लाखांच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी

0
2192

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला १ लाखांच्या खंडणीसाठी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी शुक्रवारी (दि.१) देण्यात आली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ईश्वर बापूराव ठोंबरे (वय.५८ रा. बजाज अॅटो कॉलनी, आकुर्डी) असे माजी नगरसेवकाचे

नांव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. ठोंबरे हे बजाज अॅटो कंपनीत नोकरीला आहेत. तर त्यांची पत्नी सुभद्रा ठोंबरे याही राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोंबरे यांना ७८४१९५४८०० या मोबाईल क्रमांकावरून धमकीचा संदेश आला. पाच दिवसांत खात्यावर १ लाख जमा कर,नाहीतर मरशील, धनकुडे साहेबांची ऑर्डर आहे. त्याचबरोबर खाते नंबर देऊन सोमनाथ भगवान जाधव यांचे नांव देण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्याच नंबरवरून फोन करून शिवीगाळ करण्यात आली. तसेच ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

दरम्यान आरोपीच्या मोबाईल नंबर ट्रॅप केला असता तो फलटण येथील दाखवत आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.