आंबेगाव येथे महिला सरपंचाच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न

0
414

पुणे, दि. १५ (पीसीबी) – ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून महिला सरपंचाच्या पतीच्या अंगावर कार घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि.१३) सकाळी साडेपाचच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथे घडली.

बाळासाहेब सोपानराव वनशिव (वय ५२, रा.नरहेगा) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मीनाक्षी बाळासाहेब वनशिव (वय ५०) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अविनाश कांबळे (रा. नरहे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी या नऱ्हे गावच्या सरपंच आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्या उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी आरोपी कांबळे याची पत्नी देखील निवडणुकीला उभी होती. निवडणुकी दरम्यान, बाळासाहेब वनशिव आणि कांबळे यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग कांबळे याच्या मनात होता. बुधवारी पहाटे बाळासाहेब वनशिव आणि त्यांचे मित्र प्रकाश तिलेकर हे पहाटे फिरण्यासाठी गेले. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाची कार संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, त्याच कारने वनशिव यांना जोरदार धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.