आंध्र प्रदेशातील दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रातही आणणार – अनिल देशमुख

0
250

मुंबई,दि.२४(पीसीबी) – आंध्र प्रदेशातील दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रातही आणणार तसेच राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि हल्ल्यांना प्रतिबंध घालण्याबरोबरच आरोपींना वेळेत शिक्षा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देखमुख यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

देशमुख म्हणाले,” महिलावरील अत्याचार आणि हल्ल्यांच्या घटना थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोपींना तातडीनं आणि कठोर शिक्षा करण्यासंदर्भात आंध्र प्रदेश सरकारनं कायदा केला आहे. तसा कायदा राज्यात करण्याच्या अनुषंगानं आंध्र प्रदेशात गेलो होतो. माझ्यासोबत वरिष्ठ अधिकारीही होते. तो कायदा नीट समजून घेतला आहे. दिशा कायदा महाराष्ट्रात करण्यासाठी आणि अधिक सुधारित स्वरूपात लागू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दिशा सारखा कायदा आणण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं काम हा कायदा करेल,” अशी माहिती देशमुख यांनी दिली.

दरम्यान, अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे उपस्थित होते.