अ‌ॅमेझॉनमुळे तब्बल ‘इतके’ लाख रोजगार

0
233

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) : अ‌ॅमेझॉन ही ई कॉमर्स कंपनी गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे चर्चेत होती. फ्युचर रिलायन्स डीलवरुन अ‌ॅमेझॉन वादात सापडलं आहे. मात्र, अ‌ॅमेझॉननं गेल्या वर्षभरात भारतात तीन लाख रोजगार निर्माण केल्याचा दावा केला आहे.अ‌ॅमेझॉनकडून भारताची निर्यात वाढवल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. ई कॉमर्स कंपनीद्वारे 1 बिलीयन डॉलर रुपयांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात आलं.

अ‌ॅमेझॉनचे भारतातील प्रमुख अमित अग्रवाल यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत वर्षभरात तीन लाख रोजगार निर्माण केल्याचा दावा केला आहे. अ‌ॅमेझॉनने भारतात रोजगार निर्मितीसाठी ठेवलेल्या उद्दिष्टाच्या एक तृतियांश रोजगार निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अ‌ॅमेझॉनचे संस्थापक सीईओ जेफ बेजोस यांनी भारतात2025 पर्यंत रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. जेफ बोजेस यांनी 2020 मध्ये भारताला भेट दिली होती.

भारतातून 1 बिलीयन डॉलर किमतीची निर्यात
अ‌ॅमेझॉननं भारतात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबत निर्यात देखील वाढवली आहे. गेल्या 12 महिन्यामध्ये भारतातून जवळपास 1 बिलीयन डॉलर किमतीची निर्यात केल्याची माहिती अमित अग्रवाल यांनी दिली. अ‌ॅमेझॉनने भारतात 2025 पर्यंत 1 कोटी लघु उद्योगांना डिजीटल करण्याचा उद्देश असल्याचं म्हटलं. अ‌ॅमेझॉनने आतापर्यंत 2.5 दशलक्ष लघुउद्योगांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणलं आहे.

अमित अग्रवाल यांनी अ‌ॅमेझॉननं भारतातील छोट्या व्यावसायिकांना नोकरी देणे आणि त्यांच्या व्यावसायाचं डिजीटलायझेशन करण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं. भारतात कंपनीचा चांगला विकास होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन विक्री वाढली आहे. भारतात प्रतिस्पर्धी असून देखील कंपनी चांगली प्रगती करत असल्याचा दावा अमित अग्रवाल यांनी केला.