‘पवनाकट्टा’ने राबविले स्वच्छता अभियान

0
202

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) ‘पवनाकट्टा’ या तरुणांच्या समूहाने रावेत, पिंपरी आणि चिंचवड परिसरात गुरुवारी सकाळी पवना नदीपात्रातील जलपर्णी, राडारोडा, गाळ, कचरा हटवून स्वच्छता अभियान राबविले. पवना नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी मिसळत असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर जलपर्णी फोफावली होती. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नवनाथ भोंडवे, रवींद्र भोंडवे, तानाजी भोंडवे, राजाभाऊ गोलांडे, पवन पवार, शंकर ढोकरे, नंदू भोईर, मिलिंद ढमाले, विश्वास साळुंखे, निखिल भोंडवे या ‘पवनाकट्टा’ समूहातील सामाजिक कार्यकर्त्यांनी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने नदीपात्रातील जलपर्णी, गाळ आणि कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.