अहमदनगर-पुणे मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू

0
378

नगर, दि. २२ (पीसीबी) – अहमदनगर-पुणे महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली. बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.