असदुद्दिन ओवेसींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी  

0
1799

लातूर, दि. ७ (पीसीबी) – एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दिन ओवेसी यांना वंचित बहुजन आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांनी भारीपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे.

लातूर येथे  एका सभेत पाटील बोलत होते.  यावेळी ते म्हणाले की,  महाराष्ट्र लोकशाही  आघाडीने  प्रकाश आंबेडकर नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मुख्यमंत्री होतील, असा विश्वास आम्हाला आहे.  त्यांनी असदुद्दिन ओवेसींना बरोबर घेऊन चांगले काम केले आहे. ओवेसी हे साधारण व्यक्तीमत्व असून राज्यघटनेचे  अभ्यासक आणि समर्थक आहेत.

लोकसभेत ते विनम्रतेने आपली मते मांडत असतात. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यास मुस्लीम समाजात चांगला संदेश जाण्यास मदत होईल. वंचित आघाडीचे महाराष्ट्रात खासदार निवडून येतील, एमआयएमचे आंध्र प्रदेशात खासदार येतील. देवेगौडा, चंद्रशेखर, गुजराल पंतप्रधान होवू शकतात, मग ओवेसी का नाही?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.