…अश्याप्रकारे चालकानेच केला कंटेनर मधील सव्वा लाखांच्या मालाचा अपहार

0
258

चाकण, दि. २२ (पीसीबी) – एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोच करण्यासाठी भरलेला सगळा माल पोहोच न करता त्यातील एक लाख 21 हजार रुपये किमतीच्या काही मालाचा अपहार केला. याबाबत कंटेनरचालक आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहाजी विठ्ठल तिप्पे (रा. वाडेगाव, ता. सांगोला, सोलापूर), साईनाथ दाभाडे (रा. तळेगाव दाभाडे) आणि पिकअप गाडी चालक या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुकुंद दिलीप पांचाळ (वय 31, रा. डांगे चौक, थेरगाव. मूळ रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 13 डिसेंबर रोजी मध्यरात्री बारा ते पहाटे सहा या कालावधीत म्हाळुंगे येथील जेबीएम कंपनी येथे घडली. फिर्यादी पांचाळ यांनी आरोपी शहाजी याच्या कंटेनरमध्ये लोखंडी पॅलेट भरून दिल्या. त्यानंतर शहाजी याने जेबीएम कंपनीतील कामगार साईनाथ दाभाडे याच्यासोबत मिळून कंटेनरमधील एक लाख 21 हजार रुपये किमतीच्या 11 लोखंडी मोकळ्या पॅलेट पिकअपमध्ये भरून त्याचा अपहार केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.