अशोक चव्हाणांच्या खंद्या समर्थकावर गोळीबार

0
555

नांदेड, दि. १८ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक तथा नांदेडमधील गोल्ड मन म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे पदाधिकारी गोविंद कोकूलवार यांच्यावर गोळीबार झाला आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.१७) शहरातील विणकर कॉलनी भागात कोकूलवार यांच्या कार्यालयासमोर घडली.

कोकूलवार यांना ग्लोबल रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईला हलविले आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहर हादरले आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलिस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर रुग्णालयात दाखल झाले. गोळीबार कोणी आणि का केला हे अद्याप समजले नाही. नांदेड शहर पोलिस तपास करत आहेत.