आठ दिवसांत कामे पूर्ण करा अन्यथा लोकांना धुलाई करायला लावेन – नितिन गडकरी

0
451

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आठ दिवसांमध्ये कामे पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी तंबी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या विधानामुळे नितिन गडकरी पून्हा एकदा चर्चेत आले आहेत.

परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना आठ दिवसांमध्ये कामे पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी तंबी दिल्याची माहिती स्वतः गडकरी यांनीच दिली. शनिवारी (दि.१७) नागपूरच्या एमएसएमई सेक्टर मध्ये लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी याबाबत वक्तव्य केले. आपण अधिकाऱ्यांनी कामे न केल्यास त्यांची लाोकांना सांगून धुलाई करु अशी तंबी दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना गडकरी यांनी लालफितीच्या कारभराविषयीही नाराजी व्यक्त केली