अल्पवयीन चोरट्याकडून लॅपटॉप, मोबाईल जप्त

0
373

पिंपरी, दि.१५ (पीसीबी):  पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल फोन असा १ लाख २० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील टॉप २५ पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेत होते.

त्यावेळी पोलीस शिपाई गणेश कोकणे यांना माहिती मिळाली की, भोसरी-दिघी रोड येथे दीप लॉन्स समोर एक मुलगा कोणाचीतरी वाट पाहत थांबलेला आहे. त्याच्या जवळ असलेल्या बॅगमध्ये चोरीचा लॅपटॉप, मोबाईल फोन आहे.

या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यात दोन लॅपटॉप आणि एक आयफोन कंपनीचा मोबाईल सापडला.

त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, लॅपटॉप चाकण येथील एका दवाखान्यातून आणि एक लॅपटॉप, अॅपल कंपनीचा आयफोन आळंदी रोड वरील एका ऑफिसमधून चोरी केल्याचे सांगितल्याने.

याबाबत चाकण आणि दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

मुलाकडून एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अल्पवयीन चोरटा पोलीस रेकॉर्डवरील चोर आहे.

चाकण आणि दिघी येथील गुन्ह्यासह चाकण पोलीस ठाण्यात आणखी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.