अरुण जेटली जाण्याने अभ्यासू व संयमी नेता हरपला – छजन भुजबळ

0
467

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली जाण्याने अभ्यासू व संयमी नेता हरपला, अशी भावूक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

त्यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात  अखेरचा श्वास घेतला. जेटली यांना ९ ऑगस्टला एम्समध्ये भरती करण्यात आले होते.  गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते . मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.