अयोध्येत शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना

0
857

अयोध्या, दि. २५ (पीसीबी) – अयोध्येत शिवसेनेने आपल्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना केली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना नेते आणि तेथील स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन हिंदुत्वाच्या नवीन पर्वाची सुरुवात करत आहोत, असे  युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी याप्रसंगी म्हटले. अयोध्येत शिवसेना शाखा उघडल्यानंतर  लवकरच अयोध्येत शिवसेना सदस्य नोंदणीची सुरुवात करण्यात येणार  आहे,  असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.