“अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली”

0
328

नवी दिल्ली,दि.२९(पीसीबी) – अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या एका अहवालाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली गळाभेट कामी आली नाही, असं वाटत आहे. म्हणूनच धार्मिक स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील संस्था युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमनं भारताला पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासोबत यादीत ठेवलं आहे, असं औवेसी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित केल्यानंतरही युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमच्या अहवालानं भारताला पाकिस्तान, उत्तर कोरिया, सीरिया या देशांसोबत उभं केलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी भारतावर बंधन घालण्याची शिफारसही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची गळाभेट कामी आली नाही हे यावरून सिद्ध झालं असल्याचं औवेसी यांनी सांगितलं.