“अमेरिकेतील दिवाळी किल्ला स्पर्धा २०२०”, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारितोषिक वितरण समारंभ online संपन्न झाला.

0
620

पिटसबर्ग (अमेरिका) – दि. १० (पीसीबी) – दिवाळी म्हटलं कि जसे फराळ, फटाके, पणत्या, आकाशकंदील डोळय़ांपुढे येतात, तसेच अंगणातील किल्लाही आठवतो. दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपल्या गौरवशाली इतिहासाच्या जवळ जाण्यासाठी निर्माण केलेली एक संधी आहे. . या परंपरेतूनच गडकोटांविषयी प्रेम वाढते. पुढे दुर्गभ्रमंतीची आवड जडते. भारताबाहेर रहाणाऱ्या बाळगोपाळांना या परंपरेची आणि गौरवशाली इतिहासाची ओळख व्हावी या हेतूने यंदा पिटसबर्ग सिनेरसिक,टेनसी मराठी मंडळ, ब्लुमिंग्टन् मराठी मंडळ, शार्लेट मराठी मंडळ ,सावली एंटरटेनमेंट, यु के मराठी मंडळ यांनी एकत्र येऊन “दिवाळी किल्ला ” स्पर्धेचे आयोजन केले होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारितोषिक वितरण समारंभ online संपन्न झाला.

आनंदाची गोष्ट म्हणजे स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. नॉर्थ कॅरोलिना, पेन्नेसिल्वानिया ,न्यू जर्सी ,इलुनस,विस्कॉन्सिन, साऊथ कॅरोलिना अश्या अमेरिकेतील कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी भाग घेतला.
मायभूमीपासून सात समुद्रापार असून देखील लहान मुले उत्साहाने आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहून पालक देखील यात सक्रिय सहभागी झाले. काहींनी मातीचा किल्ला बनवला तर काही मुलांनी कागदाचा. काही मुलांनी तर अगदी लेगो ब्लॉक खेळण्याचा किल्ला देखील बनवला.
खर तर, अमेरिकेत सध्या कडाक्याची थंडी चालू आहे अश्या वेळी मुलांनी कोट -टोपी चढवून , घराबाहेर जाऊन माती / दगड आणून किल्ला बनवला. मुलांची कल्पकता आणि उत्साह पाहून सर्वच जण अवाक झाले. मुलांनी नुसता किल्ला केला नाही तर त्या किल्लयाचा इतिहास , भौगोलिक रचना याबद्दल देखील महत्वपूर्ण माहिती जमवली आणि किल्ल्याद्वारे ती जिवंत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारितोषिक वितरण समारंभ online संपन्न झाला.

पुण्याचे इतिहासाचे अध्यापक आणि इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या समारंभात सरांचे “किल्ले आपल्याला काय शिकवतात?” या विषयवार अतिशय मनोरंजक आणि प्रभावी व्याख्यान झाले. ज्या मुलांनी किल्ला फक्त गोष्टीमध्ये किना चित्रात पहिला आहे. त्यांनी बनवलेले रायगड, जंजिरा , सिंहगड,सिंधुदुर्ग किल्ले पाहून परीक्षकांनी भरभरून कौतुक केले. शेटे यांनी योग्य परीक्षण तर केलेच पण त्याच बरोबर मौलिक सूचनाही केल्या.

https://www.facebook.com/KilleSpardha2020 या फेसबुक पेज वर सर्व स्पर्धकांच्या किल्ल्याचे “virtual exhibition “आपल्याला पहायला मिळेल , पेज ला जरूर भेट द्या. मुलांनी किल्ला तर छान केलाच आहे पण त्या बरोबर केलेली कॉमेंट्री – निवेदन पण ऐकण्यासारख झाल आहे. स्पर्धेत शार्लट आणि टेनसी मंडळा च्या स्पर्धकांनी बाजी मारली पण सरांनी नमूद केले कि सगळेच किल्ले खूप सुंदर होते त्या मुळे विजेता ठरवणे फार कठीण गेले.

किल्ला स्पर्धेच्या आयोजनात श्री. राहुल देशमुख (पिट्सबर्ग सिनेरसिक), श्री. संदिप पवार (शार्लट मंडळ ) , श्री. प्रमोद पाटील (सावली एंटरटेनमेंट) ,सौ. पूनम शिरवळकर (टेनसी मंडळ ), सौ. गौरी करंदीकर (ब्लूमिंग्टन मंडळ ) ,सौ. योगिता पाटील सेन – (UK मराठी मंडळ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढच्या वर्षी आणखी जास्त प्रतिसाद मिळेल आणि इतर मंडळेही या उपक्रमात सहभागी होतील अशी खात्री बाळगून कार्यक्रमाची सांगता झाली .
प्रोग्रॅम विडिओ लिंक – https://youtu.be/pXxqDokwofc
किल्ले विडिओ – https://www.facebook.com/KilleSpardha2020