अमितच्या लग्नाला नक्की जाणार ! – आदित्य ठाकरे

0
1441

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे  चिरंजीव अमित ठाकरे यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी नुकतेच मातोश्रीवर गेले होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन लग्नाचे निमंत्रण दिले. अमितच्या लग्नाबद्द्ल युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, अमितच्या लग्नाला नक्की जाणार ! जावेच लागणार आहे.  

अमितचा विवाह २७ जानेवारीला  होणार  आहे. विवाहाची जय्यत तयारी सुरु   आहे.  राज ठाकरेंनी स्वतः मातोश्रीवर जाऊन त्यांचे बंधू उद्धव ठाकरेंना लग्नाचे निमंत्रण दिले होते. मात्र,  निमंत्रण दिले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांची  तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. आदित्य ठाकरे राजकारणात सक्रीय असले तरी, अमित ठाकरे अद्यापही राजकारणापासून दूर आहेत. तर दुसरीकडे  राज ठाकरे यांच्याबद्दल तरुणाईमध्ये  नेहमीच आकर्षण राहिले आहे. आदित्य ठाकरे  अमितच्या  लग्नाला जाणार का ? अशी चर्चा सुरू होती. आता आदित्य ठाकरे यांनी  या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.