अभिनेत्री आसावरी जोशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

0
806

मुंबई, दि. १८ (पीसीबी) –  अभिनेत्री शिल्पा शिंदेनंतर आता मराठमोळी अभिनेत्री आसावरी जोशी यादेखील  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वाची विजेती टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता आसावरी जोशी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

५३ वर्षीय आसावरी जोशी यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. आता त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असून राजकारणाच्या माध्यमातून त्यांची नवी इनिंग सुरु  होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या दोघी अभिनेत्रींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, की स्टार प्रचारक होणार प्रचार करणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.