अमित शहा- उध्दव ठाकरे आज संध्याकाळी युतीची घोषणा करणार – संजय राऊत

0
676

मुंबई, दि. १८ (पीसीबी) –  भाजप अध्यक्ष अमित शहा आज (सोमवार) मुंबईत आले आहेत. शहा संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेते युतीची घोषणा करतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

शिवसेना-भाजप यांची लोकसभा निवडणुकीसाठी २३-२५ आणि विधानसभा निवडणुकीसाठी ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या युतीबाबतचा संभ्रम दूर होणार आहे.

संजय राऊत  यांनी सांगितले की,  अमित शहा आज संध्याकाळी ‘मातोश्री’वर येणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. यानंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. युतीचे जे काही फॉर्म्युले आहेत, त्याबाबत सर्व दोन्ही प्रमुख नेते घोषणा करतील, असे राऊत यांनी सांगितले.  त्याचबरोबर राज्यात  ‘अब की बार उद्धव सरकार’, अशी घोषणाही राऊत यांनी यावेळी केली.